अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी लागू केलेले तीन कृषी कायदे रद्द केल्याने शेतकऱ्यांना जो न्याय दिला म्हणजे केंद्र सरकारला उशिरा सूचलेले शहाणपण होय.
दीड वर्षांपासून शेतकरी आंदोलन करत असतांना या आंदोलनात ६०० लोकांना आपले प्राण गमवावे लागले. मात्र आगामी युपी, हरियाणाच्या निवडणुका लक्षात घेता, केंद्र सरकारने हा निर्णय काल जाहीर केला.
शेतकऱ्यांच्यादृष्टीने ही चांगली बाब आहे, परंतु जो पर्यंत अधिसूचना निघत नाही तोपर्यंत हा लढा सुरुच राहील, असे मत हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी व्यक्त केले.
केंद्र सरकारने तीन कृषी कायदे रद्द केल्याबद्दल नगर जिल्हा हमाल पंचायत येथे हमाल, माथाडी, शेतकरी यांनी जल्लोष करुन पेढे वाढून, फटाके फोडण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
पुढे घुले म्हणाले, केंद्राने शेतकऱ्यांच्या हितासाठी तीन कृषी कायदे बहुमताच्या जोरावर मंजूर करुन घेतले होते, परंतु हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताविरोधात व कंपन्यांच्या फायद्यासाठीच होते.
त्यामुळे या कायद्यास देशातील शेतकऱ्यांनी विरोध केला होता. त्यासाठी दिल्लीसह विविध राज्यात व नगरमध्येही आंदोलने झाली. या आंदोलनालाही सर्वस्तरातून पाठिंबा मिळाला. त्यामुळे केंद्र सरकारला नाईलाजास्तव हे कायदे मागे घ्यावे लागले आहेत. हा शेतकऱ्यांचा विजय असल्याचे त्यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम