अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- जिल्हा रुग्णालयातील आगीत आज सायंकाळी तेराव्या रुग्णाचा बळी गेला. गाेदाबाई पाेपट ससाणे (वय ७५, रा. वांगदरी, ता. श्रीगाेंदे) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
दरम्यान ससाणे यांचा आज उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. दरम्यान जिल्हा रुग्णालयातील काेविड अतिदक्षता विभागाला सहा नाेव्हेंबरला सकाळी आग लागली हाेती.
या घटनेच्या दिवशी ११ जणांचा बळी गेला हाेता. त्यानंतर दाेन दिवसापूर्वी आणखी एकाचा मृत्यू झाला हाेता. त्यावेळी घटनेतील मृतांची संख्या १२ झाली हाेती. त्यानंतर आज सायंकाळी गाेदाबाई ससाणे यांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हा रुग्णालय आग प्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुनील पाेखरणा यांच्यासह सहा जणांना निलंबित केले हाेते. त्यातील चाैघांना अटक झाली. अटक झालेल्या आज जामीन मंजूर झाला आहे.
डाॅ. पाेखरणा यांनी अंतरिम अटकपूर्व जामीन घेतला आहे. वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुरेश ढाकणे यांनी देखील जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.
एकीकडे घटनेतील बळींची संख्या वाढत आहे. परंतु घटनेत कारवाईच्या घाेषणा हाेत आहे. यामुळे आता दोषींवर कारवाई होणार का? असा संतप्त सवाल नागरिक करू लागले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम