प्रांताधिकाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :-  कारवाईसाठी गेलेल्या कर्जतचे प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांना शिवीगाळ झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

आता या प्रकरणी कारवाई देखील करण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक कार्यालयातील वाळू तस्कर पोलीस कर्मचारी केशव व्हरकटे याचे निलंबन झाली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी कि कर्जतचे प्रांताधिकारी यांनी आपल्या पथकासह अवैध वाळू वाहतूक करणारा टीपर पकडला असता

त्या वाहनालगत उभा असणारा पोलीस उपअधीक्षक कार्यलयात कार्यरत असणारा वाळू तस्कर पोलीस कर्मचारी केशव व्हरकटे याने थोरबोले यांना शिवीगाळ केली.

याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात व्हरकटे आणि अज्ञात चालक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. व्हरकटे यास पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार निलंबन करण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe