अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :- पाथर्डी तालुक्यातील औरंगपूर शिवारातील कळसपिंप्री व सोनोशी या गावांच्या शिवारात गेल्या चार दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांना दिसून आला आहे.
शनिवारी पहाटे सहाच्या सुमारास दोघा शेतकऱ्यांनी सोनोशी फाटयाजवळ बिबट्या पाहिला. नागरिकांनी बिबट्याचे छायाचित्र काढले असून, वनविभागाने दखल घेण्याची मागणी केली आहे.
परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. औरंगपूर व तोंडोळी शिवारात बिबट्याचा वावर आहे. बिबट्याच्या सोबत त्याची पिले असल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत.
शनिवारी सकाळी शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी बिबट्याला पाहिले व त्याचे फोटोही काढले. वनविभागाच्या स्थानिक कर्मचाऱ्यांना माहिती दिली.
वनविभागाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. परिसरात कपाशी वेचणारे व रात्रीच्या वेळी शेतात दारे धरणाऱ्यांनी बिबट्याची धास्ती घेतली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम