अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :- सध्या महाराष्ट्राचे राजकारण वेगळ्याच वळणावर चालू आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय पुढे नेण्याचे काम आपण करणार आहोत.
महसूल पोलिस किंवा इतर कार्यालयात जर शिवसेनेच्या कार्यकर्त्याला त्रास देत असला तर गाठ माझ्याशी आहे. कारण आमचा मुख्यमंत्री आमचा असल्याचा इशारा जलसंधारण मंत्री शंकराव गडाख यांनी दिला.
पारनेर तालुक्यात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यातते बोलत होते. ते म्हणाले की, शिवसेना पक्षात मरगळ आली होती ती आता माजी आ. विजय औटी यांनी गोड बोलून बऱ्याच अडचणी झाल्या आहेत.
परंतु माजी आ.औटी पुन्हा एकदा नव्या जोमाने सक्रिय झाले आहेत. एवढा विकासकामे करून पराभव का झाला याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आता कार्यकर्त्यांना आहे.
पराभव झाल्यानंतर प्रचंड त्रास झाला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्यात रस नव्हता. राज्यात महाआघाडी सरकार असून अनंत अडचणींचा सामना करावा लागत आह.े दोन वर्षापुर्वी मी निवडणुकीत निवडून आलो तर तुमच्या बरोबर येईल असा शब्द दिला होता तो पाळला असल्याचे म्हणाले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम