अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :- जिल्हा रूग्णालयातील करोना अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मात्र राज्याच्या मुख्य विद्युत विभागाकडून पोलिसांना अहवाल प्राप्त न झाल्याने तपासात अडचणी येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, 6 नोव्हेंबर रोजी आग लागून आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारने जिल्हा शल्य चिकित्सकांसह सहा जणांवर कारवाई करत चौकशी समिती नियुक्त केली. दुसरीकडे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
एक वैद्यकीय अधिकारी, दोन परिचारीका व एक परिचारक यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधार घेऊन चौघांना अटक केली असली तरी यामध्ये खरे गुन्हेगार शोधण्यासाठी चौकशी समिती, विद्युत विभाग यांचे अहवाल पोलिसांंच्या हाती येणे आवश्यक आहे.
यानंतरच तपासाला गती मिळू शकते, त्यातून खरे गुन्हेगार समोर येऊ शकतात. घटना घडल्यानंतर लगेच राज्याचे मुख्य विद्युत निरीक्षक यांनी अतिदक्षता विभागाला भेट देत नोंदी घेतल्या होत्या.
त्यानंतर त्यांनी पोलिसांना अजून अहवाल दिला नसल्याने पोलिसांना पुढील तपास करण्यात अडचण निर्माण झाली आहे. या अहवालानंतर काही गोष्ट स्पष्ट होणार आहे हे नक्कीच.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम