अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :- लोकप्रिय रिऍलिटी शो ‘बिग बॉस’मधील वादग्रस्त व्यक्तीमत्त्व अभिजीत बिचुकले प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास पुन्हा सज्ज झाला आहे.
नेहमी चर्चेत असणार अभिजीत बिचुकले मराठीनंतर आता ‘हिंदी बिग बॉस १५’ मध्ये एकतरी करणार आहे. सातारा जिल्ह्यातील राजकारणासह राज्यभरात नावलौकिक मिळालेले अभिजीत बिचुकले आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना भेटणार आहे.
बिचुकले यांची ओळख कवी मनाचे नेते तसेच राजकारणी म्हणून आहे. दीड वर्षांपूर्वी बिग बॉस मराठीच्या घरात केलेल्या एन्ट्रीमुळे अवघ्या महाराष्ट्राला त्यांची चांगलीच ओळख झाली आहे.
आता हिंदी बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून केलेल्या पदार्पणामुळे बिचुकले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. खुद्द ‘बिग बॉस 15’च्या ट्विटर हँडलवरुन त्यांची ओळख करुन देताना ‘अजब वाईल्ड कार्ड एन्ट्री’ अशी करुन देण्यात आली आहे.
बिचुकले या आठवड्यात देवोलिना चॅटर्जी आणि रश्मी देसाई यांच्यासोबत घरात एण्ट्री करणार आहेत. आता बिचुकले घरात कोणता धमाका करतात, कसे वागतात, त्यांचा खेळ कसा असेल,
बिचुकले हिंदी बिग बॉसमध्ये टिकू शकतील का, त्यांच्या येण्याने टीआरपीमध्ये किती फरक पडेल, या प्रश्नांची उत्तरं लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत.
कोण आहेत बिचुकले ? :- अभिजित बिचुकले यांचा सामाजिक, राजकीय, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील वावर कायम चर्चेचा विषय असतो.
आतापर्यंत बिचुकले यांनी लोकसभा, विधानसभा अगदी राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक लढवून झाली आहे. मात्र, आतापर्यंत कोणत्याची निवडणुकीत त्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडलेली नाही.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम