अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- भरधाव वेगात असलेल्या ट्रकची समोर चाललेल्या मोटारसायकलला पाठीमागून जोराची धडक बसली. या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला.
ही घटना नगर दौंड महामार्गावरील मढेवडगाव शिवारात घडली. अर्जुन भीमा ढवळे असे या अपघातात मृत्यू झालेल्या मोटारसायकलस्वाराचे नाव आहे. तर महिला गंभीर जखमी झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ढवळे दाम्पत्य त्यांच्या टिव्हीएस (एमएच १६ बीबी ६१९०) या मोटारसायकलवरून नगर दौंड रोडने काष्टीबाजूकडे जात होेते.
यावेळी त्यांच्या पाठीमागून आलेल्या भरधाव वेगातील ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात मोटारसायकलस्वार अर्जुन भिमा ढवळे यांना गंभीर मार लागून त्यातच त्यांचा मृत्यू झाला
तर त्यांच्या पाठीमागे बसलेल्या कमल अर्जुन ढवळे या गंभीर जखमी झाल्या आहेत. या अपघातानंतर संबंधित ट्रकचालक पसार झाला.
याबाबत कमल ढवळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकाविरूध्द गुन्हा दाखल केला असून, याबाबत अधिक तपास पोहेकॉ.झुंजार हे करत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम