अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने पाचवे पर्यावरण संमेलन राळेगणसिध्दी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.
या पाश्र्वभूमीवर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अण्णा हजारे यांची भेट घेऊन संमेलनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली. यावेळी मंडळाचे प्रमोद मोरे, वैभव मोरे,
पै.नाना डोंगरे, डॉ.महेंद्र गागरे (पुणे), मारुती कदम, धीरज वाटेकर (चिपळूण), विलास म्हाडिक, बाळासाहेब जठार, प्रमोद काकडे (दौंड), बाळासाहेब भोर, सुभाष वाखारे, सुधाकर शेटे,
तुकाराम अडसुळ, राजाराम ढवळे आदी उपस्थित होते. या संमेलनात नगर जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमी सहभागी होणार असून, पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारणासाठी उपाययोजना यावर विचारमंथन होऊन त्या दिशेने कार्य केले जाणार आहे.
हे संमेलन डिसेंबरमध्ये होणार आहे. यापूर्वी हे संमेलन राळेगणसिध्दी, चिपळूण (कोकण) व भूतानमध्ये पर्यावरण प्रेमींच्या उपस्थितीमधे पार पडले होते.
तिसऱ्यांदा हे संमेलन राळेगणसिध्दीत होत असून, सदरचे संमेलन यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम