अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- दोन वर्षांत मतदारसंघातील बहुतांशी गावात विकास पोहोचला आहे. आपल्याला प्रत्येक गावात विकास पोहोचवायचा आहे.
त्यासाठी तुमच्या हक्काचा लोकप्रतिनिधी या नात्याने विकासाचे सर्व प्रश्न सोडविण्यास बांधील असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी एका कार्यक्रमात केले.
यावेळी आमदार काळे म्हणाले की, मतदार संघातील जनता सूज्ञ आहे. जनतेला विकास पाहिजे. राज्यात शासन कुणाचे आहे व विकास कामे कोण करते याची जनतेला जाणीव आहे.
अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे यापुढील काळात देखील राज्यशासनाकडून मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक उपस्थित होते. तालुक्याच्या पूर्व भागातील अत्यंत महत्वाच्या असलेल्या संजीवनी कारखाना ते पढेगाव गोदावरी जुन्या कालव्यापर्यंतच्या रस्त्याच्या कामाची २.५ कोटीची निविदा प्रसिद्ध झाली असून लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम