अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- येत्या 4 डिसेंबरला यंदाच्या वर्षातील अखेरचे सूर्यग्रहण लागणार आहे. चंद्रग्रहणाप्रमाणेच सुर्यग्रहण सुद्धा एक महत्वपूर्ण खगोलीय घटना आहे.
ज्योतिषात ग्रहण हे अशुभ घटना असल्याचे मानले जाते. याच कारणामुळे ग्रहणादरम्यान शुभ कार्य आणि पूजा करणे टाळतात.
याबाबत ज्योतिषाचार्य डॉ. अरविंद मिश्र यांनी असे म्हटले की, चंद्रग्रहणानंतर वर्षातील अखेरचे सुर्यग्रहण 4 डिसेंबर 2021 रोजी लागणार आहे.
सुर्यग्रहण 4 डिसेंबरला सकाळी 10 वाजून 59 मिनिटांनी सुरु होणार आहे. ते दुपारी 03 वाजून 07 मिनिटांनी समाप्त होणार आहे. या दिवसी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या आहे.
वर्षातील अखेरचे सुर्यग्रहण हे अंटार्टिका, दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अमेरिकेत दिसणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नाही आहे.
त्यामुळे याचा सुतक काळ मान्य नसणार आहे. तर सुर्यग्रहणाच्या 12 तासांपूर्वी सूतक सुरु होते. हे ग्रहण उपछाया असणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम