दोन मोटारसायकलची धडक: सहाजण जखमी एकाचा मृत्यू तर दोघांची प्रकृती चिंताजनक!

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :-  दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सहाजण जखमी झाले. यातील एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

ऋतुराज अशोक काळे (वय २३,रा. मनोरी) असे या अपघातात निधन झालेल्या तरुणाचे नाव आहे.इतर जखमींवर अहमदनगर व शिर्डी येथील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

हा अपघात राहुरी तालुक्यातील राहुरी- मांजरी रस्त्यावरील आरडगावजवळ झाला. याबाबत सविस्तर माहिती अशी, कोंढवड येथील तिघेजण मानोरीकडून राहुरीकडे एकाच मोटरसायकलीवर जात होते.

याचवेळी राहुरीकडून मानोरीकडे एका मोटरसायकलवर तिघेजण जात होते. आरडगाव जवळ या दोन्ही मोटरसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने दोन्ही मोटरसायकलींवरील सर्वजण रस्त्याच्या दोन्ही बाजूला फेकले गेले.

यात रस्त्यावर दोन्ही मोटरसायकलच्या समोरच्या बाजूचा चक्काचूर होऊन रस्त्यावर चपला व गाड्यांच्या तुटलेल्या साहित्यांचा खच पडला आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक युवक, सामाजिक कार्यकर्त्यांनी रुग्णवाहिकेतून जखमींना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान ऋतुराज अशोक काळे याचा मृत्यू झाला. तर दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe