आज अंगारकी चतुर्थी, जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि पूजा विधी

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :-  गणेश भक्तांसाठी महत्त्वाची असणारी अंगारकी चतुर्थी आज मंगळवारी आहे. आजच्या दिवशी गणपतीची आराधना आणि व्रत केल्यास वर्षभरातील संकष्टीचे पुण्य मिळते अशी भावना आहे.

त्यामुळे भाविकही अगदी भक्तीभावाने गणेशाची पूजा करून, त्याच्यासाठी उपवास धरून हे व्रत करतात. आज 23 नोव्हेंबर रोजी रात्री 08:27 वाजता चंद्रोदय होईल.

जाणून घ्या पूजेचा विधी :- या दिवशी पहाटे उठून स्नान करा. यानंतर गणपतीची प्रार्थना करा. चौरंगावर स्वच्छ पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरुन त्यावर गणपतीची मूर्ती ठेवा. आता गंगा जल शिंपडून संपूर्ण स्थान पवित्र करा.

यानंतर फुलांच्या मदतीने गणपतीला जल अर्पण करा. मग लाल रंगांचं फूल, जान्हवं, धूप, पानात सुपारी, लवंग, इलायची आणि एखादी मिठाई ठेवा.

यानंतर नारळ आणि प्रसादात मोदक अर्पण करा. गणपतीला दक्षिणा अर्पण करुन 21 मोदकांचा नैवेद्य दाखवा. सर्व सामग्री अर्पण केल्यानंतर धूप, दिवा आणि उदबत्तीने गणपतीची आरती करा.

संकष्टी चतुर्थीची पूजा- विधी

– सकाळी उठल्यानंतर आधी आंघोळ करा आणि स्वच्छ धुतलेले कपडे घाला.

– सकाळी गणपतीची पूजा करा.

– गणपतीला तीळ, गूळ, लाडू, दुर्वा, चंदन अर्पण करा, वंदन करा.

– संध्याकाळी गणपतीचे पूजन करा.

– व्रत कथा सांगा किंवा ऐका.

– चंद्राला अर्ध्य अर्पण करा.

– या दिवशी गणपतीच्या मंत्रांचा जप करावा.

– पूर्ण दिवसभर उपवास ठेवावा. चंद्रोदयानंतर सोडावा.

गणेश अंगारकी श्लोक “गणेशाय नमस्तुभ्यं, सर्व सिद्धि प्रदायक । संकष्ट हरमे देवं गृहाणार्घ्यम् नमोऽस्तुते ॥ कृष्णपक्षे चतुर्थ्यातु , सम्पूजितं विधूदये। क्षिप्रं प्रसीद देवेश, अंगारकाय नमोऽस्तुते ॥”

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe