मोटारसायकलच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :-  दोन मोटारसायकलच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना राहुरी-मांजरी रस्त्यावर आरडगाव शिवारात घडली आहे. ॠतुराज अशोक काळे असे मयत तरुणाचे नाव आहे.

तर या अपघातातील इतरांची प्रकृती चिंताजनक आहे. याबाबत अधिक समजलेली माहिती अशी कि, हा भीषण अपघात घडला अपघात इतका भीषण होता की दोन्ही मोटारसायकल चक्काचूर झाल्या आहेत.

तर सर्वच सात जण जखमींना स्थानिक नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, रुग्णालयात नेत असतानाच मानोरी येथील ॠतुराज काळे (वय 21) याचा मृत्यू झाला आहे.

तर मयूर मोरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. तर कोंढवड येथील जखमींना खाजगी रुग्णांलयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

मयत ॠतुराज काळे याच्या वडीलांचा त्याच्या लहानपणीच मृत्यू झाल्याने त्याची आई, बहीण सोबत तो मानोरी येथील आपल्या मामाच्या घरी रहात होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe