अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- आपल्या एकुलत्या एक २४ वर्षीय अविवाहित मुलगा विहिरीत पडल्याचे पाहताच पित्याने त्याला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र दुर्दैवाने त्याचा यात मृत्यू झाला.
ही घटना राहुरी तालुक्यातील कणगर शिवारात घडली. भारत बाबासाहेब वरघुडे असे मृत तरूणाचे नाव आहे. काल सकाळी आठच्या सुमारास भारत वरघुडे विहिरीत पडला असता त्यांच्या वडिलांनी पाहिले व आरडाओरडा सुरु केला.
गावचे सरपंच व पोलिस पाटील यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेवर ही माहिती देऊन सोशल मीडियावर मदतीचे आहवान करण्यात आले. स्थानिक पोहणाऱ्यांनी भारत यास विहरीत शोधण्याचा प्रयत्न केला.
तोपर्यंत राहुरीच्या तहसीलदारांनी आपत्कालीन व्यवस्थापन टीम मदतीसाठी पाठविली.त्यांनी खूप प्रयत्न केले शेवटी तीन तासांनी भारत गळाला लागला.
मात्र त्यांच्या पोटात पाणी गेल्याने तो मृत झाला होता. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत भारत याच्या पश्चात आई, वडील, विवाहित बहीण असा परिवार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम