अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- कोणत्याही प्रकारचे रस्त्याचे अथवा इतर काही काम करत असताना रस्ता पूर्णपणे बंद केला जात नाही. जरी अशी वेळ आली तरी ते काम रात्री अथवा त्या रस्त्याला पर्यायी मार्ग दिला जातो.
मात्र नगरमध्ये याबाबत वेगळे चित्र दिसत आहे. शहरातील चौपाटी कारंजा ते रामचंद्र खुंट असे भुयारी गटार योजनेचे काम चालू आहे.
यासाठी चौपाटी कारंजा येथील रस्ता गेल्या आठ दिवसापासून खोदण्यात आला असून त्यामुळे चितळे रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
त्यामुळे येथील व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवावी लागत आहे व जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहे व हे काम ८ दिवसापासून चालू आहे.
काम हे रात्री करायला हवे मात्र हे दिवसा केले जाते. त्यामुळे वाहतूक कोंडी होते याकडे मनपा प्रशासन व वाहतूक शाखेचे लक्ष नाही.
त्यामुळे व्यापाऱ्यात नाराजी पसरली आहे. जर भुयारी गटार योजनेच्या कामाची अशीच कामाची प्रगती राहिली तर पुढे काम पूर्ण करण्यासाठी किती महिने लागतील याचा विचार न केलेलाच बरा असे मत व्यापाऱ्यांसह नागरिक व्यक्त करत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम