अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- विज बिलासाठी शेतकऱ्यांचे तोडलेले वीज कनेक्शन लवकरात लवकर जोडून वीज पुन्हा सुरळीत व्हावी व वीज बिल माफ व्हावे या मागणीसाठी भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी टोकाला जात महावितरण कंपनीच्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांनी त्यांना या पासून रोखत दोर बाजूला केला.
बाळासाहेब मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली नेवासा भाजपचे पदाधिकारी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते. शेतकऱ्याकडून पाच हजार रुपये न घेता तीन हजार रुपये भरून घ्यावेत ही मागणी केली होती.
मात्र ती मान्य न केल्याने मुरकुटे यांनी गळफास घेण्याचा प्रयत्न केला. भाजप पदाधिकारी यांनी त्यांना सोडवले.नेवासा एमएससीबी ऑफिस मध्ये मुख्य अभियंता समोर माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न झाला. या घटनेमुळे नगरसह राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यातील प्रत्यक्ष तालुक्यातील शेतकरी, सध्या महावितरण कंपनीने चालविलेल्या मनमानी व सक्तीच्या कारभारामुळे त्रस्त झाले आहेत.
ऐन पेरणीच्या तोंडावर, जाणीवपुर्वक विद्युत प्रवाह खंडित करणे, रोहित्र खराब झाले असेल तर ते बदलून देण्यासाठी विलंब लावणे, पाऊने २ वर्षाच्या काळात, आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांकडून सक्तीची वीज बिल वसूल करणे, या सारखा त्रास,महावितरणचे अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांना देत आहेत,
शेतकऱ्यांची पिळवणूक त्वरित थांबवावी याकरिता, नेवासा तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी, नेवासा येथील एमएससीबी च्या कार्यालयात,दोरीने फाशी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी वेळीच माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना, थांबविल्याने मोठा अनर्थ टळला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम