तुळशीच्या झाडावर थुंकु नको म्हणाल्याचा राग आल्याने मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- तुळशीच्या झाडावर थूंकू नकोस. असे म्हणाल्याचा राग आल्याने एकनाथ हापसे यांना शिवीगाळ करुन काठीने मारहाण करण्यात आली.

ही घटना राहुरी तालुक्यातील उंबरे येथे दिनांक २१ नोव्हेंबर रोजी घडली असून याबाबत आरोपी विकास जगताप याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

दिनांक २१ नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजे दरम्यान एकनाथ रंगनाथ हापसे हे राहुरी तालुक्यातील उंबरे येथे त्यांच्या घरासमोर हरिपाठ पुस्तक वाचत बसले होते.

तेव्हा त्या ठिकाणी आरोपी विकास लक्ष्मण जगताप हा त्याच्या मोटरसायकलवर बसून आला. तेव्हा तो एकनाथ हापसे यांच्या घरासमोर असलेल्या तुळशीच्या झाडाजवळ थूकत होता.

त्यावेळी एकनाथ हापसे त्याला म्हणाले कि, तुळशीचे झाड आहे. तेथे थूंकू नकोस. या कारणावरुन आरोपी विकास जगताप याने एकनाथ हापसे यांना वाईट वाईट शिवीगाळ केली.

तसेच त्यांना काठीने मारहाण करून जखमी केले. आणि तू जर परत माझ्या नादी लागला तर तूला जिवे मारुन टाकीन. अशी धमकी दिली.

एकनाथ रंगनाथ हापसे यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विकास लक्ष्मण जगताप याच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सी एन बऱ्हाटे हे करीत आहेत.