16 कैद्यांची क्षमता असलेल्या कारागृहात 91 कैदी… तुरुंगाधिकार्‍यांनी घेतला ‘हा’ निर्णय

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- कोपरगाव येथील दुय्यम कारागृहात 16 कैदी ठेवण्याची क्षमता असताना सद्यस्थितीत तेथे 91 कैदी ठेवण्यात आले आहेत. कमी क्षमता असलेल्या ठिकाणी अधिक कैदी ठेण्यात आल्याने कैद्यांची कुचंबणा होत होती.

तसेच त्यांची मोठी हेळसांड होत असल्याने अखेर तुरुंगाधिकार्‍यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. प्रश्नि कोपरगावच्या तुरुंगाधिकार्‍यांनी आरोपींना अन्यत्र स्थलांतर करण्यासाठी पुणे

येथील कारागृह उपमहानिरीक्षक यांच्याकडे परवानगी मागितली होती. त्यानुसार कोपरगाव कारागृहातील 50 आरोपींना कडक पोलीस बंदोबस्तात नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले.

यावेळी सर्व कैद्यांची कोविड टेस्ट करण्यात आली त्यानंतर कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे सर्व कैद्यांची आरोग्य तपासणी करून रवाना करण्यात आले.

कैदी स्थलांतर करण्यासाठी तहसीलदार विजय बोरुडे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, तुरुंग अधिकारी चंद्रशेखर कुलथे यांनी परिश्रम घेतले.

91 पैकी 50 न्यायाधीन बंद्यांची नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आल्याने कोपरगाव कारागृहातील उर्वरित कैद्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe