अहमदनगर ब्रेकिंग : मनोरुग्ण महिलेचा खून करणाऱ्यास अखेर अटक !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- अत्याचार, लाकडी दांडक्याने मारहाण व चाकूने वर करुन मनोरुग्ण महिलेचा खून करणारा रुपचंद मुकुतराम वर्मा (वय ४१, गिरीजानगर, जिल्हा बडोदा) याला शहर पोलिसांनी कोपरगावमधून बुधवारी अटक केली.

तालुक्यातील घुलेवाडी येथील श्रमिक विडी उद्योग संस्थेच्या सेफ्टी टॅन्कमध्ये या महिलेचा मृतदेह सोमवारी कुजलेला व नग्नावस्थेत आढळला होता. वर्मा विकास ढाब्यावर वेटरचे काम करत होता.

त्या दिवसापासून तो फरार होता. घटनेनंतर शहर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत वरिष्ठांच्या आदेशाने तपासाची चक्रे फिरवत वर्माचा २ दिवसांत छडा लावला.

त्याला कोपरगाव पोलिसांनी ताब्यात घेताच दारूच्या नशेत महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली. मात्र पैसे न दिल्याने महिलेने नकार दिला.

याचा राग येऊन त्याने तिच्यावर अत्याचार केला. लाकडाच्या दांडक्याने मारहाण व चाकूने वार करुन तिचा खून केल्याची कबुली वर्माने दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe