कुछ तो गडबड हें… सर्व कार्यक्रम रद्द करून शरद पवार दिल्लीत दाखल

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :-  मुंबईतील नियोजित सर्वच कार्यक्रम सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा ज्येष्ठ नेते शरद पवार आज दिल्लीसाठी रवाना झाले आहेत.

यामुळे, राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.विशेष म्हणजे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलदेखील दिल्लीत आहेत.

यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दिल्ली दौऱ्यात शरद पवार केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. विरोधकांची बैठक असून त्यात सहभागी होण्यासाठी शरद पवार गेल्याचंही बोललं जात आहे.

मात्र नेमकं कारण गुलदस्त्यात आहे. दरम्यान राज्यातील महाविकास आघाडी सरकारला सातत्याने अस्थीर करण्याचा प्रयत्न केंद्रातील सरकाकडून होत असल्याचा आरोप भाजप नेते करत आहेत.

मात्र, काहीही झालं तरी हे सरकार 5 वर्षे कार्यकाळ पूर्ण करेल अशी ग्वाही महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार आणि शिवसेने नेते खासदार संजय राऊत यांच्याकडून देण्यात येते.

मात्र, पवार अचानक दिल्लीला रवाना झाल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ आता शरद पवारांचंही विमान दिल्लीकडे कूच झालं आहे. त्यामुळे, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News