‘Bigg Boss 15’च्या घरातून हें तीन लोकप्रिय स्पर्धक झाले ‘आऊट’

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- ‘बिग बॉस 15’मध्ये घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहेत तर दुसरीकडे सिम्बा नागपालनंतर एक नाही तर तीन स्पर्धक घरातून बाद झाले आहेत.

यामध्ये जय भानुशाली, विशाल कोटियान व नेहा भसीन हे तिघे बिग बॉसच्या घरातून बाहेर झाले आहेत. दरम्यान गेल्या ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खानने या शॉकिंग एव्हिक्शनचे संकेत दिले होतेच.

केवळ टॉप 5 घरात राहतील आणि उर्वरित बॉटम 6 मध्ये असलेले सर्व स्पर्धक घराबाहेर जातील, त्यानुसार, बॉटम 6 मध्ये असलेला सिम्बा नागपाल घरातून आऊट झाला आणि पाठोपाठ अन्य तीन स्पर्धकांचा बिग बॉसच्या घरातील प्रवासही संपला.

घरातून चार स्पर्धक बाद झाल्यानंतर आता काही नवे स्पर्धक वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणार आहेत. ड्रामा क्वीन राखी सावंत बिग बॉसच्या घरात धमाकेदार एन्ट्री करणार आहे.

ती तिच्या पतीसोबत बिग बॉसच्या घरात येणार असल्याचीही चर्चा आहे. राखीशिवाय रश्मी देसाई व देवोलिना भट्टाचार्जी या दोघीही घरात एन्ट्री करणार आहेत.

रश्मी व देवोलिनासोबत अभिजीत बिचुकले घरात येणार होता. पण घरात येण्याआधीच तो कोरोना पॉझिटीव्ह आढळला. त्यामुळे ऐनवेळी त्याच्याजागी राखी सावंतला घरात पाठवण्याचा निर्णय मेकर्सनी घेतला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News