अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- जिल्हा परिषदेच्या बांधकाम समिती सभापती पदाच्या माध्यमातून केवळ टाकळी ढोकेश्वर गटातच नाही तर तालुक्यातील गावोगावी अनेक विकासकामे केली.
सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम केले आहे. माजी आमदार विजय औटी यांच्या नेतृत्वाखाली आमचे काम सुरू आहे. तालुक्यात आम्ही केवळ भुमीपूजनाचे बोर्डच लावत नाही तर प्रत्यक्षात कामे सुरू करतो.
असे सांगत जिल्हा परिषदेचे सभापती काशीनाथ दाते यांनी विरोधकांना अप्रत्यक्ष टोला लगावला. पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सुमारे ३५ लाख रुपयांच्या चार शाळा खोल्यांचे भुमीपूजन सभापती दाते यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, भाळवणी येथील चार शाळा खोल्यांसाठी निधी उपलब्ध करुन दिला असून, उर्वरित आवश्यक असणाऱ्या दोन शाळा खोल्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगत
पदाच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांची पावती आगामी निवडणुकीत मतदार शिवसेनेला देणार असल्याचा विश्वास दाते यांनी व्यक्त केला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम