अरे बापरे!शिक्षिकेवर कारवाईसाठी पालक शाळेला टाळे लावणार!

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :-   नगर तालुक्यातील जेऊर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या एका शिक्षिकेकडुन शाळा प्रशासन, पदाधिकारी, पालक, विद्यार्थी, व्यवस्थापन समिती तसेच ग्रामस्थांना वेठीस धरण्याचा प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरु असुन,

त्या शिक्षीकेवर तात्काळ कारवाई झाली नाही तर शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, सदर शिक्षिका शाळेत मनमानी कारभार करत असुन, कोणत्याही नियमांचे पालन करत नाही.

वेळेवर शाळेत न येणे, कधीही निघुन जाणे. शिक्षक तसेच पदाधिकारी समजवण्यास गेल्यास अरेरावी करणे. या शिक्षेकेच्या अशा कामकाजामुळे एकही पालक आपल्या मुलांना सदर शिक्षीकेच्या वर्गात बसविण्यास तयार नाही तसेच विद्यार्थी ही त्या शिक्षीकेच्या वर्गात बसण्यास नकार देत आहेत.

सदरची बाब शाळा व्यवस्थापन समिती, तसेच ग्रामपंचायत कार्यालयास कळविण्यात आल्यानंतर सदर शिक्षेकेस अनेक वेळा समजवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

परंतु काहीही उपयोग झाला नाही. ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने शिक्षणाधिकारी यांना याबाबत निवेदन देऊन सदर शिक्षीकेची बदली करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा पालकांकडुन शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe