अण्णा हजारे बरे होऊन राळेगणला ! किमान एक आठवडा कार्यकर्त्यांनी अण्णांना भेटण्याचा आग्रह धरू नये…

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार गुरुवारी नियमित वैद्यकीय तपासणीसाठी रुबी हॉल क्लिनिकला दाखल झाले होते.

गुरुवारी सर्व मुख्य तपासण्या करण्यात आल्या होत्या. उर्वरित तपासण्या शुक्रवारी सकाळी करण्यात आल्या. सर्व तपासण्यांचे अहवाल सामान्य आले असल्याने वयाच्या ८५ व्या वर्षीही अण्णा पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे डॉ. परवेझ ग्रँट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले आहे.

नियोजित सर्व तपासण्या पूर्ण झाल्याने डॉक्टरांनी अण्णांना राळेगणला जाण्यास परवानगी दिली. त्यानुसार अण्णा राळेगणकडे रवाना झाले.

दरम्यान, अण्णा रुग्णालयात दाखल झाल्याच्या बातम्या पसरल्यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह अनेक मान्यवरांनी दूरध्वनीद्वारे अण्णांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली. अण्णांच्या सोबत स्वयंसेवक श्यामकुमार पठाडे व संदीप पठारे आहेत.

अण्णांना रुग्णालयातून निरोप देण्यासाठी रुबी हॉल क्लिनिकची संपूर्ण टिम उपस्थित होती. डॉ. परवेझ ग्रँट, डॉ. मखळे, डॉ. मुनोत यांनी अण्णांच्या सर्व तपासण्या केल्या.

काही दिवस अण्णांनी संपूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला असल्याने किमान एक आठवडा कार्यकर्त्यांनी अण्णांना भेटण्याचा आग्रह धरू नये असे आवाहन संजय पठाडे यांनी केले असल्याचे सांगण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe