अनाथ आश्रमाच्या नावावर नागरिकांना लुटण्याचे प्रकार जिल्ह्यात सुरु

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यातील अनाथ आश्रमाच्या नावावर नागरिकांना लुटण्याच्या धंद्याने संपूर्ण महाराष्ट्रभर धुमाकूळ घातला असून देणगीद्वारे जमा झालेले धान्य, कपडे, तेल हे काळ्या बाजारात विकले जात असल्याचा प्रकार समोर येत आहे.

तरी या टोळ्यांवर कारवाई करण्याची मागणी श्री साई सेवा प्रतिष्ठान संस्थेने विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांच्याकडे केली आहे.

या अर्जात म्हटले आहे की, ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृह जामखेडद्वारे निराधार लोककलावंत ऊस तोड मजूर,

वीटभट्टी कामगार, गोरगरीब वंचित मुलांना मला शिकायचे या नावाखाली देणगी गोळा करण्यासाठी फसवणुकीचे गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना संस्थेने ओळखपत्र, धर्मादाय आयुक्त यांचा शिक्का नसलेले बनावट देणगी पावती पुस्तक,

संस्थेचे ध्येय उद्देश राबवलेले कार्यक्रम, मान्यवर भेटी फोटो यांची फाईल दर महिन्यास ठराविक रक्कम घेऊन दिली जाते. संबंधित व्यक्ती या अलिशान वाहनाने देणगी गोळा करण्यासाठी जातात.

त्याचा पेहराव हे कार्पोरेट क्षेत्रालाही लाजवेल असे असतात. मुलांच्या शिक्षणासाठी गणवेश, वह्या, पेन, कंपास, परीक्षा फी, आरोग्य सेवा, खर्च याबरोबर गहू, ज्वारी, तांदूळ, तेल,

नाष्टा, मसाला, भाजीपाला, किराणा यासाठीचा खर्चाच्या स्वरूपात आर्थिक रक्कम स्वीकारली जाते. त्यांच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवून अनेकजण देणगी देतात.

देणगीद्वारे जमा झालेली रोख रक्कम व शिधा यांची सायंकाळी आपसात वाटणी केली जाते. शेतकऱ्याचाही बंगला नसेल असे बंगले या लुटारू टोळ्यांनी राहाता तालुक्यातील बाभळेश्वर व सुरेगाव याठिकाणी बांधलेले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe