यंदाची अकोले नगरपंचायत निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यता

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :-  अकोले नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजप व काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला असून राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये युती होण्याची शक्यता आहे.

यामुळे यंदाची निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माजी मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप पक्ष कार्यकर्ते व इच्छुकांच्या बैठकीत कोणाशीही युती न करता नगरपंचायतची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला.

सर्वानुमते निवडणूक प्रभारी म्हणून जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे यांची निवड करण्यात आली. यासंदर्भात अलिकडेच पक्ष कार्यालयात पक्ष कार्यकर्ते व इच्छुकांची बैठक पार पडली.

यावेळी माजी मंत्री पिचड म्हणाले की, अकोले नगरपंचायत निवडणूक ही विधानसभा निवडणुकीनंतर प्रथम लागली असून, यावर पुढे होऊ घातलेल्या संस्थांच्या निवडणुका अवलंबून आहेत.

ही नगरपंचायत निवडणूक जिंकण्यासाठीच लढायची असून सर्वांनी ही निवडणूक गांभीर्याने घ्यावी. युवकांच्या हातात ही निवडणूक द्यावी, गटबाजी न करता प्रामाणिकपणे काम करा. विरोधक अप प्रचार करतील, त्याला घाबरू नका, उत्तरे द्या, सर्व ताकदीनिशी निवडणूक लढावी.

अकोले नगरपंचायत निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या. दरम्यान काँग्रेसच्या प्रदेशाध्यश नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कोणाशीही युती न करता स्वबळावर निवडणुका लढवाव्यात असे आदेश दिले आहेत,

त्याप्रमाणे काँग्रेस पक्ष नगरपंचायत निवडणूक स्वबळावर लढविण्याच्या तयारीत आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही तालुक्यातील काँग्रेस पक्षाला ताकद देण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe