घराच्या पार्कींगमधून बुलेट चोरली मात्र पोलिसांनी बुलेटसह…!

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- घराच्या पार्कींगमध्ये लावलेलली बुलेट मोटारसायकल चोरणाऱ्या एका भामट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद कले आहे.

महेश भाऊसाहेब मंचरे (वय २५, रा. गोटुंबे आखाडा, ता.राहुरी, जि.अहमदनगर) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. तर त्याने कोपरगाव परिसरातून बुलेट चोरली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि.१३ नोव्हेंबर २०२१ रोजी राहत्या घराच्या पार्किंगमध्ये बुलेट मोटारसायकल ( क्र.एमएच१७ सीएफ ७७७७) ही लावलेली असताना कोणीतरी आज्ञात इसमाने ही बुलेट मोटारसायकल चोरुन नेली.

या प्रकरणी मच्छिंद्र परसराम पोकळे (रा. ओमनगर, ता.कोपरगांव) यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके हे याबाबत तपास करत असताना त्यांना गुप्त खबऱ्याकडून सदरचा गुन्हा हा महेश भाऊसाहेब मंचरे याने केल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंचरे याला ताब्यात घेऊन याबाबत विचारपूस केली. त्याने हा गुन्हा त्याचा एक साथीदारासह केला असल्याचे सांगितले. तसेच चोरलेली बुलेट मोटारसायकल दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe