अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- कोरोनाचे संकट आले, यात काहींना आपला जीव गमवावा लागला. परंतु उपासमारीने कोणीही गेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्राच्या माध्यमातून ‘पंतप्रधान गरीब कल्याणकारी योजना’ राबवून तळागाळातील प्रत्येक गरीब कुटुंबास अन्नधान्य देऊन जगविले.
तर राज्यसरकाने गोरगरिबांच्या तोंडाला पाने पुसली. जोपर्यंत मी खासदार आहे, तोपर्यंत अन्नधान्यात भ्रष्टाचार होऊ देणार नाही. धान्याचा घोटाळा सहन केला जाणार नाही.
काळाबाजार करून मिळवलेले पैसे किती दिवस पुरतील, याचा विचार प्रत्येकाने करायची वेळ आली आहे. असे प्रतिपादन खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले.
आझादी का अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. याप्रसंगी खा. विखे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, केंद्राने गोरगरिबांना कोरोना काळात मोफत अन्नधान्य दिले.
परंतु राज्य सरकारने याचा थोडासाही विचार केला नाही. मनाचा मोठेपणा दाखवला नाही, ही शोकांतिका आहे. गोरगरिबांच्या तोंडाला पाने पुसली.
कृषी कायदे मागे घ्यावे लागले, ही दु:खाची बाब आहे. महाराष्ट्रात किती शेतकरी रस्त्यावर उतरले, किती बाजार समित्या बंद राहिल्या.
एक तरी शेतकरी आंदोलन झाले का, असा सवाल करून मग पंजाबसाठीच वेगळा कायदा, याचा विचार व्हावा. आंदोलनासाठी एसी मंडप, आंदोलनाचे २०० कोटींचे बजेट, ही इतिहासातील पहिलीच गोष्ट आहे.
यासाठी पैसे आले कुठून आले, याची विचारणा व्हायलाच हवी. एका व्यक्तीने शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेला निर्णय होता, असे ते म्हणाले. सर्वसामान्य व गोरगरीब जनता मोदींच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. त्यांचा हक्क त्यांना मिळू द्या, असे ते म्हणाले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम