अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- एकजण बाहेर दुचाकीवर बसून पहारा देत होता तर दुसरा साथिदार एटीएम मशीन सोबत छेडछाड करून पैसे लांबवण्याचा प्रयत्न करत होता.
मात्र रात्रीच्या गस्तीवरील पोलिसांना पाहताच बाहेर असलेल्या साथिदाराने पळ काढला, त्यामुळे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न फसला. याप्रकरणी पोलिसांनी एकास जेरबंद केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यात एटीएम मशीन फोडण्याचे सत्र थांबत नाही.
मागील १५ दिवसापूर्वी लोणी व्यंकनाथ येथील एटीएम मशीन उचलून नेण्याचा प्रयत्न झाल. बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याच्या प्रयत्नास दिवस उलटत नाही तोच शनिवारी मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास बँक ऑफ महाराष्ट्र्चे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला.
मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे एटीएम फोडण्याचा डाव फसला, अन् एटीएम फोडणारा एकजण पोलिसांनी रात्री ताब्यात घेतला तर एकजण पसार झाला आहे.
श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे कर्मचारी रात्री शहरातील एटीएमची तपासणी करत असताना मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास शहरातील जामखेड रस्त्यावर असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र समोर एकजण दुचाकीवर बसलेला दिसला. त्यामुळे ते त्याच्याजवळ जात असताना त्या दुचाकीवाल्याने पोलिसांना पाहून तिथून पळ काढला.
त्याचवेळी दुसरा इसम बँक ऑफ महाराष्ट्र्च्या जीन्याच्या पायऱ्यांवरून उतरताना पोलिसांना दिसला. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी करत एटीएमची पाहणी केली असता त्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांना दिसले. त्यामुळे पोलिसांनी ताब्यात घेतले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम