अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- जिल्हा रुग्णालयातील अग्नीकांडप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा आणि डॉ. सुरेश ढाकणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद शुक्रवारी (ता. २६) पूर्ण झाला.
यातच प्रामुख्याने जिल्हा शल्यचिकित्सक डो. सुनील पोखरणा व डॉ. सुरेश ढाकणे यांना जामीन मंजूर करू नये असा युक्तिवाद सरकारी पक्षाच्या वतीने केदार केसरकर यांनी केला आहे.
या अर्जावरील निर्णय आज (शनिवारी) दिला जाणार आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम ऑडिट झालेले नाही. विद्युत विभागाचे ऑडिट झालेले नाही.
अग्निशामक विभागाच्या निकषाप्रमाणे आगप्रतिबंधक उपकरणे नाहीत. अशा परिस्थितीमध्ये अतिदक्षता विभाग या इमारतीमध्ये सुरू करण्याचा निर्णय कोणी घेतला आहे.
रुग्णालयाचे प्रमुख म्हणून डॉ. पोखरणा यांना ही जबाबदारी टाळता येत नाही. डॉ. ढाकणे यांच्या वतीने ॲड. गर्जे यांनी, अटकपूर्व जामीन द्यावा, असा युक्तिवाद केला.
ज्या वेळी दुर्घटना घडली, त्यावेळी डॉ. ढाकणे गावाकडे होते. त्यामुळे या दुर्घटनेशी त्यांचा संबंध नाही. त्यामुळे अटकपूर्व जामीन द्यावा, असे म्हणणे सादर करण्यात आले.
त्यास सरकारतर्फे ॲड. केसकर यांनी आक्षेप घेतला. अतिदक्षता विभागात ड्यूटी असताना अचानक रजेवर कसे जातात. ड्यूटीमध्ये बदल करण्याचा अधिकार हा वरिष्ठांना आहे.
परिचारिका आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टर हे महत्त्वाचे निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन देऊ नये, असे म्हणणे सादर करण्यात आले. या जामीन अर्जावर न्यायालय आज शनिवारी निर्णय देणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम