इंदुरीकर म्हणाले… मी सकाळी झोपेतून उठल्यापासून माझ्यामागे कोण कोणती झंजट लावील सांगता येत नाही

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- मी सकाळी झोपेतून उठल्यापासून माझ्यामागे कोण कोणती झंजट लावील सांगता येत नाही. मी खरं बोलतो म्हणून लोक माझ्यामागे लागतात.

परंतू न डगमगता या कर्माची फळे मी भोगतो. असे प्रतिपादन समाजप्रबोधनकार निवृती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी किर्तनात भाविकांना उपदेश करताना केले.

भाविकांना उपदेश करताना इंदोरीकर महाराज म्हणाले की, आपणाला भविष्यात कुठं तरी सत्य पचवावं लागणार, मी खरं बोलतो म्हणून लोक माझ्या मागे लागतात, दोन तीन महिन्यांने असंही म्हणतील की इंदोरीकर महाराजांची नार्को चाचणी करा,

दरम्यान माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे अनिल औताडे यांनी आयोजित केलेल्या इंदोरीकर महाराज यांच्या कार्यक्रमास शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्यासह जिल्ह्यातील दोन्ही शेतकरी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

सोशल मिडीयावरील स्वत:च्या बदनामीच्या क्लिपबाबत खेद व्यक्त करत महाराज म्हणाले की, शेतकर्‍यांच्या व्यथा, वास्तव न दाखविता चुकीच्या पध्दतीने मांडल्या जातात.

आपल्या परिसरातील सहकारी साखर कारखान्याने जर 2200 रुपये भाव जाहीर केल्यावर मिडीयाला दिवसभर पट्टी चालते. अशा पद्धतीने त्यांनी माध्यमांचा देखील समाचार घेतला.