अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- शेतकऱ्यांना मीटर नसतानाही अकोले तालुक्यातील राजूर वीज मंडळ अवाच्यासव्वा बिल पाठवत असल्याचे उघड झाले आहे.
वीज कार्यालयात गेल्यावर अधिकारी व कर्मचारी विनंती करूनही बील भरावेच लागेल असे सांगत आहेत. राजूर येथील शेतकरी हेमंत गणपत देशमुख यांनी विहीर मोटारसाठी मीटर बसवून द्यावे
अशी मागणी आठ वर्ष सहायक कार्यकारी अभियंता यांचेकडे लेखी स्वरूपात केली. मात्र त्यांना मीटर दिले नाही तर एक लाख दहा हजाराचे बिल देण्यात आले.
पावसाळ्यात पाण्याची आवश्यकता नाही. उन्हाळ्यात विहिरीत पाणी नाही. हिवाळ्यात पाणी असते तर वीज कट केली जाते व ८ वर्षाचे ८ तासाप्रमाने याव्हेरज बिल देऊन गरीब शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम सुरू असल्याचे
शेतकऱ्यांचे मत आहे. ग्राहक वीज कार्यालयात गेल्यास त्याला भेट न देणे, फोन न घेणे असे प्रकार सुरू असल्याचे सतीश देशमुख, हेमंत देशमुख यांनी तक्रारीत म्हटले आहे.
तर आठ वर्षे उलटूनही तेच अधिकारी कार्यरत असून सक्षम व कर्तव्य दक्ष अधिकारी नियुक्त करावे. अशी मागणी शेतकरी यांनी केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम