माझ्या मुलाला का मारले? जाब विचारणाऱ्या महिलेला दांडक्याने मारहाण

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- लहान मुलांच्या भांडणावरुन माझ्या मुलाला का मारले असा जाब विचारणा-या विधवा महीलेला काठीने जबर मारहाण केली असल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील टाकळीमानूर येथे घडली आहे.

दरम्यान पोलिस घरी जाताच आरोपी घराला टाळे ठोकुन व पसार झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शोभा कारंडे यांची मुले व शेजारीच राहणारा मिनीनाथ उर्फ नाथा खताळ याचे लहान मुलांच्या कारणावरुन वाद झाले होते.

शोभा कारंडे यांचा मुलगा कृष्णा याला नाथाचा मुलगा महादेव याने मारहाण केली होती. त्यावरुन नाथानेही कृष्णाला मारहाण केली होती. तुम्ही मारहाण का केली ?

असा जाब शोभाने नाथा खताळ याला विचारला. त्यावेळी हातामधे असलेल्या लाकडी दांडक्याने नाथाने शोभाला जबर मारहाण केली.

यावेळी नाथाच्या पत्नीनेही शोभाला मारले. पोलिसांनी खताळ व त्याच्या पत्नीविरुद्ध मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला. पोलिस नाईक ईश्वर गर्जे तपास करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe