1 डिसेंबरपासून होणारे मोठे बदल; जे तुमच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करू शकतात

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- प्रत्येक नवीन महिन्याच्या पहिल्या दिवशी काही नवीन नियम लागू होतात किंवा जुन्या नियमांमध्ये काही बदल होतात. 1 डिसेंबरलाही काही नवे नियम लागू होणारा आहे. आज तुम्हाला डिसेंबरमधील या बदलांची माहिती देणार आहे.

आधार UAN लिंक न केल्यास पीएफचे पैसे थांबणार –

युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) 30 नोव्हेंबरपर्यंत आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही 30 नोव्हेंबरपर्यंत तसे करू शकला नाही. 1 डिसेंबरपासून तुमच्या खात्यात कंपनीकडून येणारे योगदान बंद केले जाईल. याशिवाय, जर तुम्ही आधार कार्ड लिंक केले नाही तर तुम्हाला EPF खात्यातून पैसे काढण्यातही अडचणी येऊ शकतात.

एसबीआय क्रेडिट कार्ड –

तुम्ही SBI क्रेडिट कार्ड वापरत असाल तर 1 डिसेंबरपासून SBI क्रेडिट कार्डने EMI वर शॉपिंग करणे महागणार आहे. सध्या, SBI कार्ड वापरण्यासाठी फक्त व्याज द्यावे लागते, परंतु 1 डिसेंबरपासून प्रोसेसिंग फी देखील आकारले जाईल.

होम लोन ऑफर –

सणासुदीच्या काळात बहुतांश बँका वेगवेगळ्या होम लोनच्या ऑफर देत असतात. यापैकी अनेकांमध्ये कमी व्याजदर आणि जीरो प्रोसेसिंग फीस चा देखील समावेश असतो. पण, बहुतेक बँकांच्या ऑफर 31 डिसेंबर ला संपतात. पण एलआयसी हाऊसिंग फायनान्सची ऑफर 30 नोव्हेंबरला संपते

पंजाब नॅशनल बँकेचे व्याजदर बदलले –

पंजाब नॅशनल बँकेने (PNB) खातेदारांना धक्का दिला आहे. बँकेने बचत खात्यावरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने बचत खात्यावरील व्याजदर 2.90 वरून 2.80% पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 डिसेंबरपासून नवे दर लागू होतील.

माचिसची किंमत दुप्पट केली जाईल –

माचिसची किंमत 14 वर्षांनंतर दुप्पट होणार आहे. 1 डिसेंबर 2021 पासून, तुम्हाला माचिस बॉक्ससाठी 1 रुपयांऐवजी 2 रुपये खर्च करावे लागतील.

गॅस सिलिंडरचे दर कमी होऊ शकतात –

सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमतीचा आढावा घेतात. आफ्रिकेत कोरोना विषाणूचे नवीन प्रकार आल्यानंतर कच्च्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत 1 डिसेंबरच्या आढाव्यात एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घट होण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe