अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्यामुळे तुरळक ठिकाणी बस सुरू केली आहे. मात्र बसवर दगडफेक केली जात आहे.
तर काही ठिकाणी बसचे स्वागत देखील केले जात आहे. राज्यात सध्या एकीकडे बस सुरू केल्याने काहीजण त्यावर दगडफेक करत आहेत तर दुसरीकडे याच लाल परीचे शालेय विद्यार्थिनी मात्र स्वागत करत असल्याचे चित्र दिसत आहे.
विविध मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. यातील काही मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्यामुळे मोजक्याच ठिकाणी कर्मचारी कामावर हजर झाले असून, काही बस सुरू झाली आहे.
परंतु नगरसह इतर भागात अज्ञात लोकं बसवर दगडफेक करत आहेत. त्यामुळे बसचे नुकसान होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील रंकाळा बसस्थानकावर दीर्घकाळानंतर रंकाळा – हुपरी मार्गावर एसटी बस धावली.
दरम्यान या एसटीची वाट पाहणाऱ्या शालेय विद्यार्थिनींनी मात्र एसटी कर्मचाऱ्यांचे स्वागत केले आणि आभार मानले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम