अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- अकोले तालुक्यातील राजुर येथील एकाच्या घरातून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या अल्पवयीन आरोपीस राजूर पोलिसांनी पकडले आहे. याप्रकरणी चांगुणा सुभाष नवाळी यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
याबाबत अधिक माहिती अशी कि, अज्ञात आरोपीने चांगुणाबाई नवाळी यांच्या घराचा दरवाजा उघडुन घरातील बॅगेत ठेवलेले सोन्याचे दागिने चोरुन नेले होते. याप्रकरणी राजुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास करत असताना राजुर येथील सराफ व्यवसायीकाकडे एक व्यक्ती सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी घेवून आला. त्यावर त्यांना संशय वाटल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना कळविले.
त्यानुसार पोलिसांनी सदर व्यक्तीस ताब्यात घेवून त्यांच्याकडे सखोल चौकशी केली. या अल्पवयीन आरोपीनेच नवाळी यांच्या घरुन चोरी केले बाबत कबुली दिली. त्याच्या ताब्यातुन 25 हजार रूपये किमंतीची 5 ग्रॅम वजनाची सोन्याचे मनी मंगळसुत्र पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम