अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- अकोले तालुक्यातील राजूर येथील दोन भावंडाचा निळवंडे जलाशयाच्या पुलाच्या खाली अंघोळीसाठी गेले असताना पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
समीर शांताराम पवार वय १४ आणि सोहम शांताराम पवार वय ११ रा. राजूर असे मृत्यू झालेल्या भावंडाची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि,
समीर व सोहम हे कपडे काढून जलाशयाच्या पुलाच्या खाली जाऊन अंघोळीसाठी पोहण्याठी पात्रात उतरले नी त्याच वेळी प्रवाह वाढल्याने अचानक दोघे पाण्यात बुडाले.
त्यावेळी आकाश जाधव व अर्जुन गायकवाड पुलावर उभे राहून जलाशयात पडणारे पाणी पाहत होते. त्यांनी पुन्हा समीर व सोहम यांना शोधण्याचा प्रयत्न केला तर त्यांना ते दोघे दिसले नाही त्यामुळे त्यांनी शोधाशोध केली.
मात्र दोघेही न दिसल्याने याबाबत माहिती आकाशने मुलांच्या वडिलांना कळवली. पवार कुटुंबीय तातडीने घटनास्थळी येत नदीपात्रात टायर घेऊन शोधाशोध केली.
दरम्यान रात्री उशिरा समीर चा मृतदेह सापडला तर सोमवारी सकाळी सोहम सापडला. दोघांचे मृतदेह पाहताच संपूर्ण कुटुंबीय दुःखात बुडाले.
याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचनामा केला. अकोले ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम