अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- राहाता तालुक्यातील रांजणखोल येथे एक अत्यंत धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. पत्नीस गाडीचा कट का मारला अशी विचारणा करणार्या तरुणावर घराचा दरवाजा तोडून डोक्यात तलवारीने वार कारून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला.
तसेच भांडण सोडविण्यास गेलेल्या तरुणास मारहाण करून जखमी केले आहे. याप्रकरणी राहता शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी कि, सचिन कटारनवरे याने फिर्यादीत म्हटले की, आरोपी पठारे व जगताप यांनी माझ्या पत्नीला गाडीचा कट मारल्याने त्याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी सागर व सौरभ तसेच इतरांंना एकत्र जमवून माझ्या घराचा दरवाजा तोडून घरात घुसून सागर गुंजेकर याने त्याच्या हातातील तलवारीने डोक्यात वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
तसेच भाऊ प्रविण, सुरज व पत्नीलाही लाथाबुक्क्याने तसेच लाकडी दांड्याने मारहाण केली. याप्रकरणी सचिन भानुदास कटारनवरे (वय 26, रा. आंबेडकर पुतळ्यामागे, रांजणखोल) याने श्रीरामपूर शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
त्यावरून सागर राहूल गुंजेकर, विजय पठारे, बाळासाहेब अशोक जगताप, सौरभ प्रमोद हिवाळे, किरण पवार, भारत खंडागळे, बबन पवार व इतर आठजण (सर्व रा. रांजणखोल) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसरी फिर्याद सागर राहुल गुंजेकर (वय 23, रा. रांजणखोल) याने दिली आहे. त्यावरून सुरज कटारनवरे, भानुदास कटारनवरे, सचिन कटारनवरे (रा. रांजखोल) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल करून बाळासाहेब जगताप व भारत खंडागळे यांना अटक केली असून किरण पवार व विजय पठारे हे दवाखान्यात उपचार घेत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम