अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- अकोले तालुक्यातील मान्हेरे गावच्या शिवारात एका विहिरीतील पाण्यात पडून माय लेकराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
गंगुबाई यशवंत गभाले व ज्ञानेश्वर यशवंत गभाले असे मयत दोघांची नावे आहे. दरम्यान, या घटनेने परिससरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, याबाबत राजूर येथील देशमुखवाडीचे मारुती गोगा देशमुख यांनी राजूर पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच राजूर पोलीस घटनास्थळी हजर झाले.
पण विहिरीत खूप पाणी असल्यामुळे मृतदेह पाण्यातून बाहेर काढणे अवघड झाले. यामुळे दोन विद्युतपंपाच्या सहाय्याने पाणी उपसण्यात आल्यावर मायलेकाचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.
राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक तपासणी करण्यात येऊन प्रवरानगर रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.
ही आत्महत्या आहे की घातपात हे शवविच्छेदन अहवाल आल्यावर समजणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम