अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजरात मोठी पडझड झाली होती. यामुळे गुंतवणूकदारांना मोठ्या नुकसानाला देखील सामोरे जावे लागले होते.
मात्र आज गुंतवणूकदारांसाठी एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. आज पडझडीतून शेअर बाजार सावरल्याचे चित्र आहे. आज शेअर मार्केट सुरू होताच सेन्सेक्समध्ये मोठी उसळी पहायला मिळाली.
आज सेन्सेक्स तब्बल सातशे अंकानी वधारला आहे. सध्या स्थितीमध्ये सेन्सेक्स 487 अकांच्या वाढीसह 57,552 अंकांवर स्थिरावला आहे. तर दुसरीकड निफ्टीमध्ये देखील 147 अकांची वाढ झाली आहे.
शेअर्समधील खरेदी वाढत असून, गुंतवणूकदार बँकिंग आणि ऑटोमोबाईल क्षेत्राला सर्वाधिक पसंती देत आहेत. याचाच परिणाम म्हणून ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी असल्याचे पहायाला मिळत आहे.
त्या पाठोपाठ बँकिंग क्षेत्रातील गुंतवणूक देखील वाढली आहे. दरम्यान गेल्या आठवड्यात ओमिक्रॉनच्या सावटाखाली जागतिक शेअरबाजार झाकोळून गेला होता.
ओमिक्रॉनच्या बातम्यांमुळे सेन्सेंक्समध्ये मोठी पडझड झाल्याची पहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये तब्बल 16 हजार अंकांची घसरण झाली होती.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम