हवामानतज्ञ डख म्हणतात; कोणत्याच आपत्तीत ‘ही’ कंपनी बंद पडणार नाही!

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- कोरोनामुळे दोन्ही लॉकडाऊनमध्ये जगातील सर्व कंपन्या, उद्योगधंदे बंद पडले मात्र एकमेव बळीराजाची शेती मात्र बंद पडली नाही. याच शेतकऱ्याने लॉकडाऊनमध्ये जगाला दूध, फळे, भाजीपाला,

अन्नधान्याचा पुरवठा करून जग जिवंत ठेवले. असे मत प्रसिद्ध हवामानतज्ञ पंजाबराव डख यांनी केले. श्रीगोंदा तालुक्यात या कार्यक्रमात ते बोलत होते.

पुढे बोलताना डख यांनी सांगितले की, आजपर्यंत शेतकऱ्यांना कुणीही खरा हवामानाचा अंदाज सांगितला नाही म्हणून कष्ट करून केलेल्या शेतीची परवड सुरु असल्याने

मी माझ्या वडिलांकडून प्रेरणा घेऊन इयत्ता आठवीपासून हवामानाचा सखोल अभ्यास करून खरा अंदाज वर्तविण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना योग्यकाळात पीकपेरणी,

गारपीट, आकाशातील वीजेपासून संरक्षण करण्यासाठी शास्त्रीय माहिती दिली. सुमारे१९९६ सालापासून जागतिकीकरण वेगाने वाढल्याने वृक्षतोड करून उद्योगधंदे, सिमेंटची जंगले वाढली.

त्याचा परिणाम म्हणून पृथ्वीच्या तापमानात वाढ झाल्यामुळे अलीकडे अतिवृष्टीचे प्रमाण वाढून जलआपत्ती वाढली आहे. त्यामुळे वृक्ष संपदा वाढविण्याचे आवाहन देखिल त्यांनी केले.