अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन यात एक तरूण पोलिस गंभीर जखमी झाला आहे. ही घटना पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर घडली.
पाथर्डी पोलिस ठाण्यातील एकनाथ गर्कळ हे पाथर्डी पोलीस ठाण्यात आपली ड्युटी बजावण्यासाठी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास येत होते.
त्यावेळी आगसखांड गावाच्या फाट्यावर राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या मोठ्या खड्डयांमुळे गर्कळ यांचा अपघात झाला.यात ते गंभीर जखमी झाले आहेत.
त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.ठेकेदाराने रस्त्याचे खोदकाम करून त्यातील माती रस्त्यावरच टाकली आहे.
त्यामुळे या मातीच्या ढिगाऱ्यामुळे अपघात होऊन गर्कळ खोदलेल्या खड्ड्यात पडले.त्यांच्या चेहऱ्याला जबर मार लागला आहे.
कल्याण- विशाखपट्टणम या राष्ट्रीय महामार्गाच्या दुरवस्थेमुळे अनेकांचे बळी गेले .सर्वानीच या रस्त्याच्या कामासाठी आंदोलने केली.
अपघातास कारणीभूत असणाऱ्या ठेकेदार व शासकीय अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी वेळोवेळी आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम