आळंदीवरून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात !

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- एकादशीची वारी करून आळंदीहून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात १६ भाविक सुदैवाने बचावले असून, दोन गंभीर जखमी झालेल्या भाविकांना पाथर्डी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पाथर्डी तालुक्यातील पाखरे पिंपळगाव फाट्यावर भाविकांची ही पिकप पलटी झाली. आळंदी येथून दर्शन घेऊन हे भाविक परभणी कडे जात होते.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर पाखरे पिंपळगाव फाट्यावर हा पिकअप पलटी झाला. एकादशी निमित्त परभणीकडील हे भाविक आळंदीला गेले होते.

दर्शन घेऊन हे भाविक पुन्हा परतत होते .या दरम्यान पाथर्डी तालुक्यात पाखरे पिंपळगाव फाट्यावर बुधवारी सायंकाळी आठ वाजता ही घटना घडली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe