अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- अर्बन बँकेच्या झालेल्या निवडणुकीत सर्व सभासद मतदारांनी मोठा विश्वास व्यक्त करून सहकार पॅनलला विजयी केले आहे. बँकेचा वाढलेला एनपीए कमी करून बँकेला अडचणीतून बाहेर काढण्यास प्राधान्य देणार आहे.
बँकेच्या प्रगतीसाठी कृतिआराखडा तयार केला असून त्यानुसारच पुढील कारभार करणार आहे. बँकेला गतवैभव प्राप्त करून स्व.दिलीप गांधी यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे.
वसुलीवर अधिक भर देणार आहे. प्रशासक काळात ७० कोटींचे थकीत कर्ज मी वसूल केले आहे. आम्ही कोणताही फ्रॉड केलेला नाहीये म्हणूनच कर्ज वसूल करू शकलो.
उद्यापासून कामास सुरवात करताना सर्वप्रथम बँकेच्या सर्व शाखांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबवून सर्व शाखा चकाचक करून नव्या उमेदीने काम सुरु करणार आहे,
असे प्रतिपादन अर्बन बँकेचे नूतन चेअरमन राजेंद्र अग्रवाल यांनी केले. नगर अर्बन बँकेत झालेल्या चेअरमन व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक उपनिबंधक दिग्विजय आहेर
यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या सभागृहात झाली. या बैठकीत बँकेच्या चेअरमन पदी राजेंद्र अग्रवाल व व्हाईस चेअरमन पदी दीप्ती गांधी यांची सर्वानुमते निवड झाली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम