जिल्ह्यातील ‘या’ १८ गावात होणार पोटनिवडणूक

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :-  नगर तालुक्यातील १८ गावातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. या वर्षीच्या सुरुवातीलाच नगर तालुक्यात तब्बल ५७ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या.

मात्र, त्यातील १८ जागा सध्या रिक्त आहेत. या जागांवर आता तहसीलदार उमेश पाटील यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. तहसील कार्यालयात ही निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, मतदान २१ डिसेंबर रोजी होणार आहे.

पोटनिवडणूक या १८ गावात होणार बुन्हाणनगर, वडारवाडी, पिपळगाव लांडगा, पारेवाडी, रतडगाव, आगडगाव, बुरुडगाव,

खडकी, वाळकी, निबोंडी, निंबळक, पिप्री घुमट, जखणगाव, पिंपळगाव कौडा, धनगरवाडी, वाटेफळ,आंबिलवाडी, शिराढोण

निवडणूक कार्यक्रम उमेदवारी

अर्ज भरणे – ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर,

अर्ज छाननी – ७ डिसेंबर

अर्ज माघार/ चिन्ह वाटप ९ डिसेंबर

मतदान – २१ डिसेंबर

मतमोजणी – २२ डिसेंबर

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe