अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- शिर्डी शहरात एक अत्यंत खळबळजनक घटना घडली आहे. शिर्डी शहरात नगर -मनमाड महामार्गाच्या कडेला एक आणि कणकुरी रोडलगत असलेल्या ओढ्याजवळ एक असे दोन व्यक्तीचे मृतदेह आढळून आल्याने शिर्डी शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबतची माहिती शिर्डी पोलिसांना मिळाल्या नंतर पोलिसांनी घटनास्थळी जात दोन्ही मृत्यूदेहचा पंचनामा केला असुन दोन्ही मृत्यूदेह ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, यातील एका मृत्यूदेह जवळ काही कागदपत्र आढळून आले आहे. एकनाथ हाटे राहणार मुंबई कल्याण येथील आधार कार्ड आढळून आले असुन काही हॉस्पिटलचे कागदपत्रही आढळून आले आहेत.
शिर्डी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद दाखल केली असुन एकनाथ हाटे यांच्याकडे मिळवून आलेल्या कागदपत्रावरून त्यांचा कुटूंबियांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे.
दुसरा व्यक्ती हा शिर्डीत भिक्षेकरु म्हणुन राहत असल्याच दिसुन येतय. गेल्या दोन दिवसा पासुन शिर्डीत थंडी आणि त्यात रिमझीम पाऊस कोसळत असल्याने शिर्डीतील भिक्षाकरूना निवारा नसल्याने या थंडीत गारठुन जात आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम