अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यातील १५ जण आंतरराष्ट्रीय प्रवास करून आले आहेत. मुंबई आणि दिल्ली येथील विमानतळावरून त्याबाबत माहिती स्थानिक जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे.
त्यानुसार या प्रवाशांचा शाेध घेण्यात येत आहे. त्यातील अहमदनगरमधील दाेघांशी महापालिका प्रशासनाने संपर्क साधून, काेराेना चाचणीसाठी त्यांचे नमुने घेतले आहेत.
या दाेघांना पुढील १४ दिवस विलगीकरण कक्षात राहावे लागणार आहे. आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्या संबंधित नागरिकांचा शोध घेऊन त्यांची चाचणी होईपर्यंत जिल्ह्याची चिंता वाढली आहे.
अहमदनगर शहर आणि काेपरगावातील प्रत्येकी दाेन, राहाता आणि राहुरी येथील प्रत्येकी तीन, श्रीरामपूरमधील चार आणि संगमनेरमधील एक, असे १५ जण अहमदनगर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय प्रवास करून आले आहेत.
या प्रवाशांच्या नावाची यादी, पत्ता प्रशासनाला मुंबई आणि दिल्ली विमानतळावरून देण्यात आला. या प्रवाशांचा शाेध सुरू असून, त्यांची तपासणी हाेणार आहे.
काेराेनाच्या नवा ओमायक्राॅन या व्हेरिएंटमुळे जगभर चिंतेचे सावट आहे. लाेकसभा अधिवेशनात देखील यावर चर्चा झाली. कर्नाटकमध्ये या व्हेरिएंटचे दाेन जण बाधित असल्याचे निष्पन्न झाले.
त्यामुळे राज्य सरकार देखील अलर्ट झाले आहे. परराज्यातून येणाऱ्यांना काेराेना चाचणी अनिवार्य केली आहे. त्याचबराेबर केंद्र सरकारने देखील आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्यांना विलगीकरण सक्तीचे केले आहे.
अहमदनगर जिल्ह्यात आलेल्या १५ प्रवाशांचा प्राप्त माहितीनुसार शाेध घेतला जात असून, अहमदनगर महापालिका हद्दीतील दाेघा प्रवाशांचा शाेध लागला आहे. या दाेघांपैकी एक जण युके आणि दुसरा अमेरिकेच्या वाॅशिंग्टन येथून आला आहे.
या दाेघांचे काेराेना चाचणीसाठी नमुने घेतले आहेत. त्यांचा अहवाल लवकरच प्राप्त हाेईल. त्याचबराेबर पुढील १४ दिवस त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे.
उर्वरित १३ जणांचा शाेध घेण्यासाठी संबंधित तालुक्याच्या आराेग्य यंत्रणेला जिल्हा प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम