अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- गेल्या 13 वर्षांपासून प्रेक्षकांमध्ये आपली लोकप्रियता कायम ठेवणारी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हि मालिका आजही घरोघरी पहिली जाते.
यातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांचे आवडते बनले आहे. या मालिकेतील जेठालालची भूमिका साकारणारे दिलीप जोशी यांच्या विषयी एक अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे.
दिलीप जोशी यांच्या घरी लवकरचं सनई चौघडे वाजणार असल्याचं सांगितलं जात आहे. ही बातमी ऐकून जेठालाल यांचे चाहते नक्की कोणाचं लग्न असा प्रश्न विचारत आहेत.
दिलीप जोशी यांच्या मुलीचे यंदाच्या महिन्यात लग्न होणार आहे. दरम्यान लोकप्रिय अभिनेते दिलीप जोशी यांना दोन मुले आहेत. हे फार लोकांना माहीत नाही.
मुलगा ऋत्विक जोशी आणि मुलगी नियती जोशी. दिलीप जोशी यांची मुलगी डिसेंबरमध्ये लग्न बंधनात अडकणार आहे. जेठालाल यांना होणार जावई एनआरआय आहे.
डिसेंबर महिन्याच्या 11 तारखेला त्यांच्या मुलीचं लग्न होणार असल्याचं समोर येत आहे. तर मुंबईतील ताज हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार असल्याचं सांगितलं जात आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम