‘या’तालुक्यात अवकाळीने शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :-  चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस त्यापाठोपाठ पडलेल्या दाट धुक्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा फटका बसला आहे.

पावसामुळे श्रीगोंदा तालुक्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांसह सर्व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी केली जात आहे.

आधीच कोरोनामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना मागील चार पाच दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर आस्मानी संकट कोसळले असून, श्रीगोंदा शहरासह तालुक्यातील अनेक गावात जोरदार पाऊस पडला आहे.

अवेळी आलेल्या पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला असून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे महागडी औषधे, फवारण्या यामुळे कंबरडे मोडले आहे.

पावसाने काढणीला आलेला कांदा भिजून खराब झाला असून कपाशी या पिकांना मोठा फटका बसला आहे. नवीन लागवड केलेले कांदे पावसाच्या पाण्यात खराब झाले आहेत.

तर कपाशी भिजून गेल्याने देखील मोठे नुकसान झाले आहे,. त्याचबरोबर टोमॅटो, भोपळा, वांगे या तरकरी पिकाचे देखील मोठया प्रमाणावर नुकसान झाले. पावसामुळे डोळ्यादेखत उभी पिके खराब झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News